तातळेवाडी येथे इनर व्हील क्लबच्या साहाय्याने विविध सामाजिक उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

बेलगांव तऱ्हाळे ग्रामपंचायत अंतर्गत तातळेवाडी येथे आज पुन्हा एकदा विकासकाम उपक्रम संपन्न झाला. तातळेवाडी येथे इनर व्हील क्लबच्या देवळाली कॅम्प शाखेच्या वतीने सामाजिक सहकार्य उपक्रम राबवला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ यांच्या उपयोगी साहित्य देण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमांसाठी सतरंज्या, निसर्गाच्या सानिध्यात आरामासाठी निवांत बसण्यासाठी अतिशय चांगल्या दर्जाचे बाक बसवण्यात आले. हे सर्व साहित्य सहकार्याच्या भावनेतून इनर व्हील क्लब देवळाली कॅम्पच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या मनाने आणि भावनेने आपल्यासाठी दिली याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.ग्रामपंचायत सदस्य संतोष वारुंगसे, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांच्या प्रयत्नातून हे साहित्य उपलब्ध केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

ह्या उपक्रमासाठी इनर व्हील क्लब देवळाली कॅम्पच्या पदाधिकारी मीना पाटील, आडके मॅडम, गुप्ता मॅडम, स्मिता सुंदरमन, संतोष शिंदे, नंदुभाऊ फडोळ यांचे सहकार्य लाभले. आज साहित्य वाटपाचा कार्यक्रम तातळेवाडी येथे संपन्न झाला. यावेळी इनर व्हील क्लबचे पदाधिकारी, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, ग्रामपंचायत सदस्य संतोष वारुंगसे, सुशीला तातळे, विठ्ठल तातळे, आशा तातळे, ज्ञानेश्वर तातळे, रामदास तातळे, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. सहकार्याबाबत सरपंच अशोक मोरे, उपसरपंच सुवर्णा हिरामण आव्हाड,सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि तातळेवाडी ग्रामस्थांनी आभार मानले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!