वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
शेतकरी व सामान्य नागरिकांच्या सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य नोंदी कमी करण्याची मोहीम महसूल विभागाने राबविली आहे. सातबारा उताऱ्यावरील अनावश्यक बोजा अशा एकुण ७७३ नोंदी कमी केल्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी-विक्री, कृषी कर्ज घेण्यास अडचणी दूर होण्यास मदत होणार असल्याची माहीती तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दिली. शेतकरी व सामान्य नागरिकांच्या जमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा असलेल्या सातबारा उताऱ्यावर गेल्या अनेक वर्षापासून इतर हक्कांमध्ये तगाई, बंडिंग, सावकारी बोजे आणि नजर गहाण यासह अस्तित्वात नसलेल्या संस्थांच्या नावाच्या विविध बोजांच्यानोंदीआहेत. जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील जुन्या सावकारी कर्जाच्या नोंदीमुळे अनेक जटील प्रश्न निर्माण होत होते.
त्यामुळे शेतकरी व नागरिकांना जमिनीची खरेदी विक्री करतांना व संपादित जमिनीचा मोबदला वाटप करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. या करीता जिल्हा विभागीय अयुक्त राधाकृष्णन गमे व जिल्हा अधिकारी सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाने इगतपुरी तालुका महसुल विभागाने अशा प्रकारच्या नोंदी निर्गंत करण्याची धडक मोहीम घेऊन सुमारे ७७३ कालबाहय नोंदी कमी केल्या. जिल्हयातील सर्व महसुल विभागांना अशा कालबाह्य नोंदी कमी करण्याचे आदेश विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नशिक विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर ही अंमल बजावणी करण्यात आल्याची माहिती तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दिली. संगणीकृत सातबारा मधील इतर हक्कातील कालबाह्य कमी केलेल्या नोंदी इगतपुरी तालुक्यात एकुण महसुली गावे १२६, सातबाराची संख्या ८०४१५, तगाई नोंद ३७७, बडिंग नोंद ३३५, सावकारी बोजे नोंद ४५, रद्द भूसंपादन नोंदी १६, आयकर बोजे नोंद १८, अस्थीत्वात नसलेल्या संस्था/सोसायटी बोजे नोंदी ६१, एकुण कालबाह्य सातबारा नोंदीची संख्या स्तंभ ५ ते १० यांची बेरीज ८५२, तगाई नोंद ३७७, बडींग नोंद ३३५, सावकारी बोजा नोंद ४०, एकुण कालबाह्य नोंदी ७/१२ ची संख्या स्तंभ १२ ते १७ ची बेरीज ७७३ बाबत अंमल बजावणी कार्यवाही करण्यात आली.
सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य नोंदी कमी झाल्यामुळे महसुली अभिलेख परिपूर्ण व दोषविरहित होऊन शेतकरी व सामान्य नागरिकांना त्याचा नक्कीच फायदा होईल. राज्यातील ही एक अभिनव मोहीम असुन अभिलेखे दोषविरहीत झाल्याने वाद-विवाद कमी होतील.
- परमेश्वर कासुळे, तहसीलदार इगतपुरी