शैक्षणिक सुविधांसाठी सदैव कटिबद्ध : आमदार कोकाटे ; टाकेदला जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव सोहळा

निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १७

विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव सोहळा शनिवारी टाकेद येथे पार पडला. कोरोना काळात महत्वाची भूमिका बजावून कुटुंबाची पर्वा न करता सेवा बजावली त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने गुणगौरव आयोजित केला होता. शिक्षक स्वतःचे कलागुण विद्यार्थ्यांमध्ये उतरवून आदर्श विद्यार्थी घडवण्याचे अविरत कार्य करत असतात. समाज घडवण्याची ताकद शिक्षकांमध्ये असून सर्व कलागुणांमध्ये सुदृढ विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांचा महत्वाचा वाटा असतो. गुणगौरव हा शिक्षकांना प्रोत्साहित करून आदर्श विद्यार्थी विद्यार्थी घडवण्यासाठी कौतुकाची थाप असते, असे आमदार माणिकराव कोकाटे यांनी मनोगतात सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे तर अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी होते. व्यासपीठावर माजी आमदार शिवराम झोले, पांडुरंग गांगड, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, सामाजिक कार्यकर्ते भूषण डामसे, श्याम निरसड, डॉ. श्रीराम लहामटे, डॉ. जयंत कोरडे, नामदेव भोसले, भगवान भोईर, काशीनाथ कोरडे, वसंत भोसले, संतोष वारुंगसे, गौतम भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निवृत्ती तळपाडे, मारुती कुंदे, पांडुरंग आंबेकर,नारायण गांजवे, इंदुमती धिंदले, भोईर सर, मारुती लोहकरे, लोटे सर आदींसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!