पूजेच्या दुकानात भरधाव पिकअप घुसल्याने अपघातात १ ठार, १ गंभीर तर दोघे किरकोळ जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६

मुंबई नाशिक महामार्गावर इगतपुरी येथील घाटनदेवी मंदिरासमोर असलेल्या पूजेच्या दुकानात भरधाव पिक अप वाहनाने जोरदार धडक दिली. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. पिक अप वाहन बॅरिगेट्स तोडून सरळ दुकानात घुसली. यामध्ये बबली भेडीया लालचंद सिंग रा. तळेगाव हे ठार झाले. एक जण गंभीर जखमी तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. नशीब बलवत्तर असल्याने दुकानदारांची 3 मुले बाहेर खेळत असल्यामुळे वाचली. कालच दसरा झाल्याने आज दर्शनासाठी गर्दी नव्हती. गर्दी असती तर मोठा अपघात झाला असता. अपघात एवढा तीव्र होता की जोरदार आवाज परिसरात झाला. या अपघातात गरीब दुकानदाराचे खुप नुकसान झाले आहे. जखमींना पुढील उपचारासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे यांनी ग्रामीण रुग्णालय इगतपुरी येथे दाखल करण्यात आले आहे. इगतपुरी पोलिसांनी नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!