अतिदुर्गम कुरुंगवाडीच्या शेतकऱ्यांना मोफत डिजिटल सातबारा उताऱ्याचे वितरण

निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २

स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांना मोफत डिजिटल सातबारा वाटप योजनेचा शुभारंभ केला आहे. महसूल विभागाने गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यात मोफत सातबारा वाटप सुरू करण्यात आले आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी तालुक्यातील सर्व महसूल मंडळात शेतकऱ्यांना अद्ययावत डिजिटल सातबारे वाटप करण्यात आले.

इगतपुरी मंडळातील अतिदुर्गम कुरूंगवाडी येथे मंडळ अधिकारी पूनम निलके यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच गोपाळ सावंत व संदीप कडनोर यांच्या हस्ते सातबारा वाटप करण्यात आले. कुरूंगवाडी येथील खातेदार शेतकऱ्यांनी कार्यक्रमाला सहभाग नोंदवला. डिजिटल सातबारा वाटप काही दुरुस्ती, नाव दुरुस्ती अथवा क्षेत्र दुरुस्ती दुरुस्ती असल्यास अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन तलाठी संदीप कडनोर यांनी केले. यावेळी खातेदार शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!