टाकेद बुद्रुक भागातील शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा वाटप संपन्न

निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २

इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी तेजस चव्हाण व तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकेद बुद्रुक महसूल मंडळात पिंपळगाव मोर येथे मोफत सातबारा वाटप कार्यक्रम झाला.इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक मंडळातील पिंपळगाव मोर येथे मंडळ अधिकारी रुपाली सावळे, तलाठी संदीप कडनोर यांच्या हस्ते मोफत डिजिटल सातबारे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन शंकांचे निरसन केले. ई-पीक पाहणीसाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मिळाली असून शेतकऱ्यांनी पीक पाहणी करण्याची आवाहन केले. पिंपळगाव मोर-धामणीला तलाठी संदीप कडनोर, टाकेद धामणगावचे तलाठी सचिन कराटे, इंदोरे खडकेदच्या वर्षा देशमुख, खेड वासाळीचे प्रदीप कातारे यांनी गावच्या सजांवर डिजिटल उताऱ्यांचे वाटप केले.
केले.

शासनाकडून उपलब्ध होतील तसतसे उतारे वाटप करण्यात येईल. खातेदार शेतकऱ्यांची पोच घेण्यात येत असून दुरुस्ती असल्यास दुरुस्तीसाठी अभिप्राय घेण्यात येत आहेत.
- संदीप कडनोर, तलाठी, पिंपळगाव मोर

Leave a Reply

error: Content is protected !!