इगतपुरीनामा न्यूज, दि. २
कोराेना महामारीमध्ये तिच्या पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिची ७ वर्षाची चिमुकली अनया ही मुलगी रोजरोज सतत पप्पांची आठवण काढत होती. अन तिलाही पतीशिवाय जीवनामध्ये स्वारस्य वाटत नव्हते. ह्यातच तिची ७ वर्षीय अनया ह्या चिमुकलीसोबत चर्चा झाली. ह्यामध्ये ठरले की, पप्पा जिकडे गेले आपणही दोघी तिकडेच जाऊ…! ह्याप्रमाणे नाशिक येथील विनयनगर भागात आई आणि चिमुकल्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरली. सुखसागर अपार्टमेंट, विनयनगर, नाशिक येथील सुजाता प्रविण तेजाळे वय ३६, चिमुकली मुलगी अनया प्रविण तेजाळे वय ७ या मायलेकींनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुजाता तेजाळे यांचे दीर अशाेक तेजाळे हे सुजाताच्या घरी गेल्यावर आत्महत्येचा प्रकार लक्षात आला.
आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी