त्र्यंबकेश्वर तालुक्यात शेतकऱ्यांना मोफत सातबारा : सभापती दिवे, विनायक माळेकर यांच्या हस्ते झाले वाटप

इगतपुरीनामा न्यूज, दि. २

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी येथे 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त  शेतकरी खातेदारांना मोफत संगणकीकृत सातबारा देण्याच्या विशेष मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शेतकरी बांधवांना मोफत सातबारा वाटप करण्यात आले. त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार दीपक गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे सभापती मोतीराम दिवे, नाशिक जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विनायक माळेकर यांच्या हस्ते मोफत सातबाऱ्याचे वाटप करण्यात आले. यावेळी वेळुंजेचे मंडळ अधिकारी हेमंत कुलकर्णी,  हिरडीचे तलाठी मनोहर राठोड, ग्रामसेविका आशा जाधव, माजी सरपंच मुरलीधर खोटरे, अनिल खोटरे, काळूबाबा, कोतवाल गंगाराम गोऱ्हे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमासाठी निवासी नायब तहसीलदार राठोड, निकम रावसाहेब, सोनवणे रावसाहेब, कैलास जाधव, आगलावे भाऊसाहेब यांचे सहकार्य लाभले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!