इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील तळोघ येथे कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शन करणारा कार्यक्रम घेण्यात आला. कृषी क्षेत्राची भावी दिशा यावर इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी मौलिक मार्गदर्शन केले. इगतपुरीचे मंडळ कृषी अधिकारी मनोज रोंगटे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी शेतकऱ्यांना विविधांगी माहिती दिली. उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढ कशी साध्य करता येते याबद्धलही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक रावसाहेब जोशी यांनी एसआरटीभात लागवड पद्धत, दीपक भालेराव यांनी महाडीबीटी योजना तर मंगेश कोकतरे यांनी माती नमुना कसा काढावा व तपासणीनंतर पिकनिहाय योग्य खत मात्रा याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. कृषी सहाय्यक समाधान भोये यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाप्रसंगी सरपंच संतू भगत, उपसरपंच जनार्दन लंगडे, पोलीस पाटील वामनराव लंगडे, कृषी मित्र मच्छिंद्र लंगडे, महिला बचत गट अध्यक्षा जया लंगडे, रत्ना लंगडे, कृषी सखी सुषमा कडू, उद्योग सखी आशा लंगडे, सुंदरा लंगडे यांच्यासह गावातील प्रगतशील युवा शेतकरी, महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group