इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
इगतपुरीच्या गिरणारे गावातील सुनिल राणु लहाने यांनी विधी परीक्षेत यश मिळवले आहे. विधी शाखेत उत्तम गुण, प्रथम श्रेणी मिळवून ते उत्तीर्ण झाले आहेत. जळगाव येथील एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाच्या विधी शाखेचे ते विद्यार्थी आहेत. गिरणारे येथील राणू मारुती लहाने यांचे ते सुपूत्र असून त्यांच्या यशाबद्धल परिसरात कौतुक करण्यात येत आहे.
सुनिल राणु लहाने यांनी विधी शाखेत 89.50 टक्के गुण प्राप्त करीत प्रथम श्रेणी प्लस मिळविले.जळगाव येथील महाविद्यालयात तीन वर्ष कालावधीचे प्रशिक्षण पुर्ण करून त्यांनी द्वितीय वर्षातील चार विषयांत, तृतीय वर्षातील पाच विषयांत विशेष प्राविण्य पटकावले आहे. यासाठी त्यांना विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, उपप्राचार्य महाजन, विभागप्रमुख डी. आर. क्षीरसागर, प्राध्यापिका पहुजा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. ॲड. सुनिल लहाने यांनी या यशानतंर पुढे जेएमएफसी परीक्षा देण्यासह दिवाणी व महसुल न्यायाधिकरणात सराव करण्याचा मानस व्यक्त केला आहे. शिवप्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष धनराज म्हसणे, फांगुळगव्हाणचे ग्रामपंचायत सदस्य ईश्वर चव्हाण, अनिता म्हसणे, आतिष पंडित आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.