थकबाकी भरून कटू प्रसंग टाळण्याचे बँकेचे आवाहन
इगतपुरीनामा न्यूज, दि. 29
इगतपुरी विभागात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण थकबाकीदार सभासद १४८७ असून ९ कोटी ३९ लाख एवढी थकबाकी आहे. यापैकी १३१ सभासदांचे ७६ लाख रुपयाचे दाखले प्राप्त केलेले असून उर्वरित १३५६ सभासदांचे 8 कोटी ६४ लाख रुपयांचे १०१ वसुले दाखले प्राप्त होणार आहेत. यापैकी तालुक्यातील १५० सभासदांकडे ५ कोटी ३ लाख थकबाकी असून वर्तमानपत्रात त्यांची नावे प्रसिद्ध होण्यापूर्वीच्या नोटीसा बँकेकडून दिलेल्या आहेत. यापूर्वी जिल्ह्यातील टॉप थकबाकीदारांची यादी इगतपुरी तालुक्याच्या सर्व शाखा, वि. का. संस्था, आदिवासी संस्था व ग्रामपंचायत येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे.
आता इगतपुरी तालुक्यातील १५० प्रमुख थकबाकीदार यांच्या नावांच्या याद्या तालुकाभरात बँक शाखा, वि. का. संस्था, आदिवासी संस्था, ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे प्रदर्शित केल्या जातील. यापूर्वी बँकेने ५२ सभासद यांचे १ कोटी ३८ लाख रुपयाचे अपसेट प्रस्ताव सहाय्यक निबंधक कार्यालय इगतपुरी यांचेकडे दाखल असून त्यापैकी ३९ सभासद यांचे १ कोटी ४६ लाख रुपयाचे अपसेट दाखले मिळविलेले आहेत. पैकी ३६ सभासदांचे १ कोटी ४४ लाख रुपये वसुली कामी उद्या ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर जमिनींचे लिलाव घोटी येथे आयोजित केलेले आहे. या लिलावात भाग घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
तरी उर्वरित सर्व थकबाकीदार यांना जिल्हा बँकेचे प्रशासक अरुणजी कदम, मुख्यकार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे, तालुक्याचे सहाय्य्क निबंधक अर्चना सैंदाणे, कर्मचारी संघटना अध्यक्ष रतन जाधव, सचिव रमेश शेवाळे, सरव्यवस्थापक नितीन ओस्तवाल, पालक अधिकारी श्री. गव्हाणे, तालुक्याचे विभागीय अधिकारी संतोष हुकिरे, बँकेचे सर्व बँक निरीक्षक, शाखा व्यवस्थापक व संस्थेचे सर्व सचिव बंधू यांनी सर्व थकबाकीदार सभासदांना आपली थकबाकी बँकेत भरून कटूप्रसंग टाळावा असे आवाहन केलेले आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यातील सर्व थकबाकीदार यांची थकबाकी चौकशीकामी सचिवांकडे बँकेकडे धावाधाव चालू असल्याचे चित्र आहे.