ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बेलगाव तऱ्हाळे येथे मधमाशी पालन जनजागृती कार्यक्रम

निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २७

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे येथे कृषीदूत सुशांत आव्हाड याने मधमाशी पालनाबाबत जनजागृती केली. नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय चर्चासत्र झाले. मधमाशी पालनाबाबत त्यात सुशांत आव्हाड यांनी माहिती देऊन फायदे सांगितले. मधमाशीपासून मधाशिवाय परागकन, मेन, राजल असे पदार्थ मिळतात. याशिवाय मधमाशीद्वारे वेगाने होणाऱ्या परागीभवनामुळे विविध पिकामध्ये फळधारणा वाढून उत्पादनात वाढ होते अशी विविध माहिती कार्यक्रमात देण्यात आली.

कार्यक्रमात पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, शेतकरी संजय आव्हाड, विलास आव्हाड, भरत वारुंगसे, भरत आव्हाड, बाळू आव्हाड, अनिल सोनवणे, मधुकर आव्हाड आदी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी शेतकऱ्यांच्या मधमाशी पालनाबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले. यावेळी प्रा. डॉ. आय. बी. चव्हाण, कार्यक्रम समन्व्यक प्रा. एस. बी. सातपुते, प्रा. एस. बी. देसले, प्रा. डॉ. भगुरे, प्रा. के. जे. पानसरे, मधमाशी अभ्यासक प्रा. डॉ. डी. एस. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.