आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांसह ग्रामपंचायतीचे विज कनेक्शन कट करू नका : माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांची मागणी

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

इगतपुरी तालुक्यात या महिन्यात पावसाने दगा दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसा अभावी शेतात पेरलेले पीक जळुन जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांना विहीरीतुन विज पंपाने पिकाला पाणी भरावे लागत आहे. मात्र तालुक्यातील विज वितरण कंपनीने सर्रासपणे शेतकऱ्यांच्या विज पंपाचे व तालुक्यातील ग्रामपंचायतीचे विज बिल थकल्याने विज कनेक्शन कट करण्याचे काम सुरू केले आहे. याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांनी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांना साकडे घातले. मेंगाळ यांनी याबाबत उर्जामंत्री व पालकमंत्री यांना भेटुन याबाबत मार्ग काढणार असुन तो पर्यंत महावितरण अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे व ग्रामपंचायतीचे विज कनेक्शन कट करू नये अशी मागणी विज वितरण अधिकाऱ्यांना केली आहे.

आधीच शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल कवडीमोल भावाने माल विकावा लागत आहे. कधी कधी तर माल फेकण्याची वेळ येत आहे. ग्रामपंचायतींचे विज कनेक्शन कट केल्याने रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट बंद असल्याने गावात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आधीच सर्वसामान्य नागरीक कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडल्याने डबघाईला आला आहे. म्हणुन विज वितरण अधिकारी यांनी संकटाच्या काळात शेतकरी, ग्रामपंचायती व सर्वसामान्य नागरीकांना वेठीस न धरता सहकार्य करावे असे आवाहन माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!