
इगतपुरीनामा न्यूज – टिटोली जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक मॉडेल स्कूलमधून बदली झालेले राजकुमार गुंजाळ, मंगला धोंडगे ह्या दांम्पत्याला ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधत ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. टिटोली येथे गेल्या सात वर्षांपासुन उत्तम शिक्षण सेवा हे शिक्षक दांम्पत्य देत आहेत. शिक्षकांच्या बदलीत राजकुमार गुंजाळ, मंगला धोंडगे या दांम्पत्याची इगतपुरीतील खैरगांव येथे बदली झाली आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल भोपे यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ध्वजारोहणाबाबत ठराव केला. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांकडुन ह्या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात येत आहे. टिटोली शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला गायकवाड-शार्दुल यांना उत्तम प्रशासकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्याबद्दल तर रोजगार युवा तांत्रिक सहाय्यक वंदना बोंडे यांना शासनाच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराने ग्रामपंचायत टिटोलीकडुन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व ग्रामस्थ पालक श्री संग्राम सोशल ग्रुपचे पदाधिकारी, गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, कृषि सहाय्यक उपस्थित होते.
