इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
इगतपुरी पंचायत समितीला पंचायती राज समितीने भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. पंचायती राज समितीचे गटप्रमुख आमदार सुभाष धोटे, किशोर दराडे, कैलास पाटील घाडगे, माधवराव जवळगावकर, अमरनाथ राजूरकर यांच्या समितीने ही भेट दिली. समितीने सन 2017-18 ह्या वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला. समिती सोबत विधिमंडळाचे अधिकारी शशिकांत साखरकर, प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके, शिक्षणाधिकारी प्राथमिक गौतम अग्निहोत्री आदी अधिकारी उपस्थित होते.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती पाटील जाधव, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, सभापती सोमनाथ जोशी, माजी उपसभापती भगवान आडोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, पंचायत समिती सदस्य विठ्ठल लंगडे, मच्छिंद्र पवार, जेष्ठ नेते रघुनाथ तोकडे, रंगनाथ कचरे, हरिश्चंद्र चव्हाण, अनिल भोपे, ज्ञानेश्वर जमधडे, मोहन भोर यांच्या आदींच्या हस्ते उपस्थित समितीचे स्वागत करण्यात आले. यावेळी पंचायत राज समितीला सभापती सोमनाथ जोशी, माजी उपसभापती भगवान आडोळे, जेष्ठ नेते रघुनाथ तोकडे आदींनी निवेदन दिले
इगतपुरी तालुक्याच्या कामकाजाचा आढावा गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी दिला. समितीने तालुक्यातील कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी सहायक गटविकास अधिकारी अमित भुसावरे, उपअभियंता प्रविण शिरसाट, उपअभियंता भाऊसाहेब खातळे, बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, गटशिक्षणाधिकारी राजेश तायडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप कागणे, कृषी अधिकारी नंदकुमार अहिरे, संदीप मोगल, विस्ताराधिकारी संजय पवार, पृथ्वीराज परदेशी, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, मेघा अहीरे, सहाय्यक प्रशासन अधिकारी छाया पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचालन विस्ताराधिकारी अशोक मुंढे, संदीप दराडे यांनी तर आभार सहाय्यक गटविकास अधिकारी अमित भुसावरे यांनी केले.