केपटाऊन व्हिला रहिवाशी संकुलाच्या विरोधात पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण : मागण्यांची दखल नसल्याने इगतपुरी तहसील समोर उपोषण

वाल्मिक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

फसवणुक करून बळकावलेल्या जमिनीवर इगतपुरी महामार्गालगत केपटाऊन व्हिला रहिवाशी संकुल उभारले आहे. यामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत व्यवसायावर कारवाई व्हावी, बळकावलेली जमीन परत मिळावी या मागणीसाठी पीडित शेतकरी सखाराम खातळे आजपासून इगतपुरी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे. याबाबत निवासी नायब तहसीलदार प्रविण गोंडाळे यांना ५ दिवसांपूर्वी निवेदन देऊनही काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आमरण उपोषण सुरू केले असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहील असे उपोषणकर्त्यांनी सांगितले.

याबाबत उपोषणार्थी शेतकऱ्याने दिलेली अधिक माहिती अशी की, इगतपुरी येथील सर्वे नं. २२४/१, २२४/२ पैकी लेआऊट प्लॉट क्र.१ व २ या मिळकती लगत सर्वे नं. २२५ ची मिळकत आहे. ह्या जमिनीवर पीडित शेतकरी सखाराम भिकाजी खातळे यांची फसवणुक करून श्री साई डेव्हलपर्स यांनी केपटाऊन व्हिलाज रहिवाशी संकुल बांधले. याबाबत न्यायालयाने व्हिलाजचे बांधकाम बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. ही बाब न्यायप्रविष्ठ असुनही या संकुलात अनाधिकृत व्यवसाय सर्रासपणे सुरू आहे. येणारे पर्यटक मद्यप्राशन करीत धिंगाणा करत असून अनेक मादक पदार्थाचे सेवन व विक्री केली जाते. यामुळे स्थानिक रहिवाशी व संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

याबाबत पोलीस ठाणे व तहसील कार्यालय आणि पोलीस अधिक्षकांसह जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्याने निवेदन दिले. मात्र सवांधितांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट तक्रार का केली म्हणुन श्री साई डेव्हलपर्सचे अधिकारी शेतकरी सखाराम खातळे यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत. अखेर आजपासून सखाराम खातळे इगतपुरी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. या व्हिलाजच्या बंगल्यांना सील करावे व न्याय प्रविष्ठ असलेल्या प्रकरणाच्या निकालाची प्रतिक्षा करावी अशी शेतकरी सखाराम खातळे यांची अपेक्षा आहे.

भुमिपुत्रांच्या वडीलोपार्जीत जमिनीवर बाहेरील बिल्डर असे अतिक्रमण करून जमीन बळकावत असेल तर ही फारच भयंकर बाब आहे. खातळे यांना न्याय मिळावा म्हणुन शिवशाही संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असुन खातळे यांना सर्वोतोपरी मदत उभी करणार
- ॲड. रोहित उगले, अध्यक्ष शिवशाही संघटना

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!