स्वातंत्र्यदिनानिमित्त कृषी आयुक्तांच्या वतीने इगतपुरीत गुणवंत अधिकाऱ्यांचा गौरव : तालुका कृषी अधिकारी तंवर यांच्या हस्ते झाला सन्मान

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

इगतपुरी येथील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोविड नियमांचे पालन करून अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. इगतपुरी तालुक्यात सोयाबीन बियाणे ग्राम बिजोत्पादन मोहीम २०२० अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्या वतीने सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

इगतपुरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक किशोर भरते, संजय पाटील, कृषी सहायक सुधाकर सोनवणे, किरण सोनवणे, विनोद सांगळे यांचा यावेळी कृषी आयुक्तांच्या वतीने तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी कृषी अधिकारी एस. एन. गोसावी, मंडळ कृषी अधिकारी भास्कर गीते, चंद्रशेखर अकोले, अनिल मुजगुडे, सहाय्यक अधीक्षक संदीप पवार, कृषी पर्यवेक्षक रामा दिघे, संजीव चव्हाण, किशोर भरते, संजय पाटील, सोनवणे, कृषी सहाय्यक मोहन तागड, किरण सोनवणे, सुधाकर सोनवणे, खैरनार, लिपिक योगेश राजपूत, मुकेश जाधव, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हितेंद्र मोरे आदी कर्मचारी उपस्थित होते.