तळोशीच्या शाळेला बजाज फायनान्सकडून शैक्षणिक साहित्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बजाज फायनान्सच्या माध्यमातून तळोशी येथील जिल्हा परिषद शाळेतील २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून सराव करता यावा यासाठी साहित्य महत्वाचे आहे असे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव तथा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर गुंजाळ यांनी सांगितले.

या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच बच्चू गिरे, उपसरपंच जितेंद्र डोळस, पोलीस पाटील नीता गुंजाळ, मंगेश गीते, अर्जून गुंजाळ, ग्रामसेवक संदीप निरभवणे, मुख्याध्यापक नंदकुमार फाकटकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या साहित्यासाठी शिक्षक संतोष श्रीवंत यांनी विशेष प्रयत्न केले होते.