ई पीक पाहणी ॲपबाबत इगतपुरी तालुक्यात प्रशिक्षण संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४

इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी व पारदेवी येथे ई पीक पाहणी बाबत महत्वपूर्ण शिबिर संपन्न झाले. इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी राम तौर यांनी ई-पीकपहाणीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले. ह्या शिबीरामध्ये तलाठी राम तौर यांनी ई-पीकपहाणी बाबत प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष ॲप कसे वापरावे यांचे सविस्तर मार्गदर्शन केले.काही होतकरू स्वंयसेवकाना इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षित करून मदत करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षणाप्रसंगी प्रगतिशील शेतकरी भागीरथ भगत, बबलु गटकळ, हिरामण भगत, कृषी सहाय्यक दीपक भालेराव आदींसह गावातील शेतकरी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!