सांजेगाव नांदडगाव उपसरपंचपदी सिंधुबाई काळे बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४

इगतपुरी तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत सांजेगाव/ नांदडगाव येथील उपसरपंचपदी सिंधुबाई काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवड बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच निता गोवर्धने होत्या. मावळते उपसरपंच मच्छिंद्र गोवर्धने यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त होते. म्हणून उपसरपंच पदासाठी विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी सिंधुबाई काळे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक के. जे. कुलकर्णी यांनी सिंधुबाई काळे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.

निवडीप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल खातळे, मंगेश शिंदे, मच्छिंद्र गोवर्धने, इंदुबाई गोवर्धने, मुक्ता गोवर्धने, मनिषा गोवर्धने, सिताबाई गोवर्धने उपस्थित होते. केरु गोवर्धने खंडु गोवर्धने, नंदु गोवर्धने, शंकर गोवर्धने, पंडित काळे, नाना गोवर्धने, त्र्यंबक काळे, काशिनाथ गोवर्धने, योगेश काळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!