इगतपुरीनामा न्यूज – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर “मेरी माटी मेरा देश” हा उपक्रम हाती घेण्यात आला. देशभरातील गावांगावातुन अमृत कलश स्थानापन्न करण्याचा उपक्रम राबवणे सुरु आहे. भारताच्या रक्षणासाठी सीमेवर असलेल्या सैनिकांना मानवंदना आणि विभुतींच्या आठवणींचे स्मरण करण्यासाठी इगतपुरी येथे हा उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी इगतपुरी पंचायत समिती कार्यालयात जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा टिटोली येथील विद्यार्थ्यांनी आपल्या लेझीम नृत्यातुन सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. टिटोली येथील रथावर शाळेच्या विद्यार्थींनींसोबत अमृत कलशासह जंगी प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभात फेरीत गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी सहभाग घेतला. टिटोली शाळेच्या चिमुकल्यांसह कार्यालयातील महिला कर्मचारी, इगतपुरी बिटातील शिक्षिका, ग्रामसेविका यांच्या सोबत लेझीम नृत्यात सहभाग घेतला. कार्यालयातील पुरुष कर्मचाऱ्यांसह शिक्षक, ग्रामसेवक लेझीम नृत्यात सहभागी झाले.
कार्यक्रमावेळी इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित भुसावरे, बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे, उप अभियंता संजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, ग्रामविस्तार अधिकारी संजय पवार, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी किशोर दळवे, ग्रामसेवक, शिक्षक, बांधकाम विभाग, लेखा विभाग, अंगणवाडी कार्यकर्त्या, आरोग्यसेविका, केंद्रप्रमुख आदी उपस्थित होते. लेझीम पथकासोबत मुख्याध्यापिका मंगला शार्दुल, राज्य आदर्श शिक्षक सिध्दार्थ सपकाळे, राजकुमार गुंजाळ, रामदास गंभिरे, स्नेहल शिवदे उपस्थित होते.