वाडीवऱ्हे, गोंदे दुमाला पासून साकुर पर्यंत १६३ शेतजमिनी “समृद्धी” साठी होणार संपादित

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ( राज्य महामार्ग ( विशेष ) क्र. २ साठी इगतपुरी तालुक्यातील खासगी जमीन संपादित करण्याचा उद्धेश घोषित करण्याबाबत शासकीय अधिसूचना ११ जूनला शासन राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तथा भूमी संपादन अधिकारी तेजस चव्हाण यांनी शासन अधिसूचना नाशिकच्या दै. पुढारी ह्या स्थानिक वृत्तपत्रात आज प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार आजपासून २१ दिवसांच्या आत संपादित केल्या जाणाऱ्या जमीन मालकांकडून अथवा हितसंबंध असणाऱ्या व्यक्तींकडून हरकती स्वीकारल्या जाणार आहेत.

इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे, गोंदे दुमाला, बेलगाव कुऱ्हे, कुऱ्हेगाव, नांदूरवैद्य, नांदगाव बुद्रुक, साकुर ह्या गावांतील १६३ शेतजमिनी संपादन होणार आहे. ह्या ७ गावांतील कोणते गट नंबर संपादित होतील ? क्षेत्र किती ? यासह अधिक माहिती पाहण्यासाठी सोबत दै. पुढारी मधील संपूर्ण पानाच्या जाहिरातीचा फोटो पाहता येईल. झुम करून वाचकांनी माहिती घ्यावी.

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात झूम करून पहावी

दै. पुढारी, नाशिक दि. २४ जुलै २०२१ पान ५