इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
आजकाल अनेक क्षेत्रातील सामाजिक संस्था शैक्षणिक क्षेत्रात बदल घडून आणण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. याचप्रकारे मुंबई येथील ऊर्जा फाउंडेशन शैक्षणिक क्षेत्रातील डेव्हलपमेंटसाठी पुढे सरसावताना दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील गरुडेश्वर येथे ऊर्जा ग्रुपच्या महिला सदस्या जानेवारी महिन्यात संक्रातीच्या निमित्ताने गरीब गरजूंना ब्लॅंकेट वाटप करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरुडेश्वर येथे आल्या होत्या. ह्या गावात मदत करण्यासाठी आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी व ज्ञानेश्वर बांगर या शिक्षक बांधवांनी ऊर्जा ग्रुपकडे आवहन केले होते.
त्यानुसार ब्लॅंकेट वाटप कार्यक्रमात गरुडेश्वर शाळेतील शिक्षक ज्ञानेश्वर बांगर यांनी शाळेतील मोडकळीस आलेल्या वर्गखोली व किचन शेड बद्दल माहिती दिली. प्रत्यक्षात वस्तुस्थिती सुद्धा दाखवली. विद्यार्थ्यांची पावसाळ्यात होणारी गैरसोय दाखवण्यात आली. ह्या गोष्टीची गांभीर्यता लक्षात घेऊन इंजिनिअर आणि कारागीर बोलावून हे काम करण्या संदर्भात चर्चा केली.
लागलीच पुढील पंधरा दिवसांत कामाला सुरुवात करून वर्गाचे व किचन शेडचे बांधकाम, प्लास्टर,पत्रे दुरुस्ती, वर्गाला आतून घोटाई, नवीन दरवाजे, कलरिंग लाईट फिटिंग, वर्गात मुलांना बसण्यासाठी लाकडी बाके, कपाट, कम्प्युटर देऊन वर्गखोली सुसज्ज करण्यात आली. ऊर्जा फाउंडेशनने केलेली मदत अविस्मरणीय आहे. शाळेच्या प्रगतीच्या वाटचालीत ऊर्जा फाउंडेशनचा मोलाचा हात आहे.
ऊर्जा फाउंडेशन मुंबईच्या वतीने आणि शाळेतील शिक्षक ज्ञानेश्वर बांगर यांच्या प्रयत्नाने आमच्या गावातील शाळेत खुप दिवसांपासून मोडकळीस आलेली वर्गखोली व स्वयंपाक गृह याची दुरुस्ती करून अगदी सुसज्ज करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
- श्री. हिरामण वारघडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष