आगरी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त घोटीत नेत्र तपासणी शिबीर संपन्न

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २

आगरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणपत दादा कडु यांच्या मार्गदर्शनाखाली घोटीत आगरी सेनेचा ३५ वा वर्धापन दिनानिमित्त नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबीरात आगरी सेनेच्या ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले. या कार्यक्रमात गणपत दादा कडु, आगरी सेनेचे नेते रघुनाथ तोकडे, आगरी सेनेचे सुरेश कडु, मेहुल शहा, युवा आगरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश कडु, युवा जिल्हाध्यक्ष अरुण भागडे, जिल्हाध्यक्ष संपत डावखर, युवा जिल्हा उपाध्यक्ष अनिल भोपे यांनी आगरी सेनेच्या कार्याची माहिती दिली.

या शिबीरात कोरोनाचे सर्व नियम पाळत दिवसभर चाललेल्या शिबीरात जवळपास दिडशे लाभार्थीनी या शिबीराचा लाभ घेतला. या प्रसंगी आगरी सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणपत कडू, जेष्ठ नेते रघुनाथ तोकडे, सुरेश कडू, युवा आगरी सेना उपाध्यक्ष गणेश कडू, लालू दुभाषे, राजू छत्रे, जिल्हाध्यक्ष संपत डावखर, सखाराम जोशी, युवा उपजिल्हाध्यक्ष अनिल भोपे, युवा जिल्हाध्यक्ष अरुण भागडे, निलेश जोशी, भाऊराव भागडे, बाळू कडू, विनोद भागडे, संपत म्हसणे, कैलास कडू, सिद्धेश्वर आडोळे, योगेश आडोळे, सोमनाथ आतकरी, मंगेश म्हसणे, अमित आडोळे, चंद्रकांत आडोळे, धनराज म्हसणे आदी उपस्थित होते.