रचना : सौ. माधुरी शेवाळे पाटील
जिल्हा प्राथमिक शाळा मोडाळे
ता. इगतपुरी, जि. नाशिक
संवाद : 7587493260
लागे मृगाची चाहूल
मन सुकावले सारे
नभी वर्दळ मेघांची
सुटू लागलेच वारे…!! १ !!
मोर फुलवी पिसारा
दिसे गालिचा हिरवा
मिळे नेत्र सुख जगी
ऋतू हिरवा हिरवा..!! २ !!
सुखावतो शेतकरी
करे पेरणीची घाई
फोडी ढेकळ जमिनी
संगे बैलजोडी नेई…!! ३ !!
लगबग पेरणीची
सोबतीला नांगरणी
रिमझिम पावसात
करू ओळीत पेरणी..!! ४ !!
शांत करी धरणीला
कोसळत सरसर
नभी दाटले वादळ
ढग चाले भरभर..!! ५ !!
चहूकडे हिरवळ
वाहे डोंगरी निर्झर
निघे सारे पर्यटक
हर्ष होई होडीवर…!! ६ !!
वन भोजन करती
मुरी, बोंबील, खेकडी
जोडी नाचणी भाकरी
आहे कोळंबी वाकडी…!! ७ !!