हिरामण खोसकर यांच्या विजयासाठी मजूर संस्था व सुशिक्षित बेरोजगार संघटना उतरली मैदानात : सक्रिय पाठिंबा घोषित करून विजयी करण्यासाठी काम करणार

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार हिरामण खोसकर यांच्या विजयासाठी इगतपुरी तालुका मजूर संस्था व सुशिक्षित बेरोजगार संघटना आता मैदानात उतरली आहे. सर्वांनी हिरामण खोसकर यांना विजयी करण्यासाठी त्यांना सक्रिय पाठिंबा घोषित केला आहे. संपूर्ण मतदासंघात ह्या दोन्हीही संस्थांचे जाळे भक्कम असून महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांच्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांकडून काम सुरु करण्यात आले आहे. इगतपुरी त्र्यंबक मतदारसंघाच्या विकासासाठी हिरामण खोसकर हे सक्षम उमेदवार असल्यामुळे  जाहीर पाठिंबा देण्यात आल्याचे यावेळी पदाधिकारी म्हणाले.

error: Content is protected !!