इगतपुरीत रेल्वे डब्याला लागली आग

वाल्मिक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

इगतपुरी येथील टिटोली रेल्वे यार्डात मालगाडीसह इतर रेल्वे गाड्या तपाण्यासाठी उभ्या केल्या जातात. आज दुपारी या रेल्वे यार्ड परिसरात उभ्या असलेल्या दुर्घटना सहायता राहत गाडीच्या डब्याला अचानक आग लागली. घटनेची माहिती समजताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

इगतपुरी येथे ३वाजता अचानक रेल्वे गाडीचा एका बोगीला आग लागली असल्याची माहिती महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील फायर ऑफिसर हरिष चौबे यांना मिळाली. त्यांनी लगेच महिंद्रा कंपनीचे फायर ब्रिगेड )ला घटनास्थळी रवाना केले. रेल्वे बोगीत ऑक्सिजन सिलिंडरला आग लागली असल्याने व सिलिंडर ब्लास्ट होत असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व रेल्वे लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचारीं तातडीने आग विझवण्याचे काम चालू केल्याने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या घटनेचा रेल्वेच्या वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नसुन रेल्वे एक्सप्रेसची वाहतुक सुरळीत सुरू होती.
घटनास्थळी महिंद्रा कंपनीचे फायर ऑफिसर हरिष चौबे, फायरमन मनोज भडांगे ,अजय म्हसणे, ज्ञानेश्वर केणे उपस्थित होते.