मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाला इगतपुरी तालुक्यातून प्रारंभ

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्हा वाहतूक सेना व इगतपुरी तालुका वाहतूक सेनेच्या वतीने ६१ हजार वृक्षारोपण संकल्प मोहीम घोटीत राबविण्यात आली. इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथे आज वृक्षारोपण करण्यात आले. सर्व महाराष्ट्रभर ६१ हजार वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे उपनेते बबनराव घोलप यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बबन घोलप होते त्यावेळी ते बोलत होते. तसेच मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफील्म कंपनीच्या गेटवर वाहतुक शाखेचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष उदय दळवी, शिवसेनेचे सुधाकर बडगूजर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे प्रमुख अजीम सय्यद, देवानंद बिरारी, माजी सभापती रघुनाथ तोकडे, सभापती सोमनाथ जोशी, संजय जाधव, उपतालुकाप्रमुख कुलदीप चौधरी, राजाभाऊ नाठे, सरपंच रामदास भोर, संजय आरोटे, केरु देवकर, दिलीप चौधरी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

इगतपुरी तालुक्यात आज इगतपुरी तालुका शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना घोटी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाहतुक सेनेचे इगतपुरी तालुकाप्रमुख पंढरी गायकर, उपाध्यक्ष भगीरथ काळे, योगेश टाकळकर, सुधाकर पाळदे, भास्कर खातळे, दिलीप तोकडे, संपत दरणी, वामन साळुंखे, राहुल काळे, , खंडु आव्हाड, संदीप खातळे, अक्षय साळुंखे, सुनील आव्हाड, समाधान तांबे, नामदेव तळपाडे, तुकाराम चौधरी, संदीप शिंगोटे, भगवान गव्हाणे आदी उपस्थित होते.