
इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ – मुंबई आग्रा महामार्गावर आज दुपारी जिंदाल कंपनीजवळ डीजेच्या गाडीने ओमनी वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. शिवाजी पंढरी डगळे वय 25, सुनीता शिवाजी डगळे 26, जिजाबाई पंढरी डगळे वय 40 रा. लहांगेवाडी, प्रमोद लक्ष्मण अहिरे वय 40, निर्मला प्रमोद अहिरे वय 30, जयदीप प्रमोद अहिरे वय 13 रा. सातपूर दयाराम शंकर मोहिते वय 50 रा. खंबाळे आश्रम शाळा शिक्षक, नसीब मोहम्मद अमीन शेख वय 50 रा. घोटी अशी जखमींची नावे आहेत.