टेनिस बाॅलवर प्रथमच पावसाळी क्रिकेट स्पर्धा

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

बेलपाली ( हरसुल ) ता. त्र्यंबकेश्वर येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कै. पांडुरंग राऊत यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिव गर्जना क्रिकेट क्लबने आयोजित केलेल्या टेनिस बाॅलवर पावसाळी क्रिकेट स्पर्धचे उदघाटन आज पार पडले.
शिवसेना नेते मिथुन राऊत,उपसरपंच सुभाष मेघे, दशरथ गोतरणे, उत्तम राऊत, सुरेश गायकवाड, अरुण मेघे, सुनिल चौधरी, भरत हिलीम, पंडीत भुसारे, राहुल चौधरी, जितेंद्र मेघे, विशाल भोये, विशाल मेघे व शिव गर्जना क्रिकेट क्लब खेळाडूंच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी मिथुनराऊत म्हणाले की, शासनाचे कोरोना नियम पाळुन खेळाचा आनंद घेतला पाहिजे. या भागातील खेळाडूंनी कला कौशल्य दाखवावे. जिंकणे किंवा पराजित होणे या खेळातील दोन बाजु आहेत. परिसरातील खेळाडूंनी क्रिकेट सारख्या मैदानी खेळातुन हरसुल परीसराचे नाव मोठे करावे असे आवाहन त्यांनी केले. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 21 हजार, द्वितीय 11 हजार, तृतीय 5 हजार अशी बक्षिसे आयोजकांकडुन दिली जाणार आहेत.