दोन अपघातात ३ युवक गंभीर जखमी ; नरेन्द्राचार्य रुग्णवाहिकेने वाचवले प्राण

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

गोंदे दुमाला आणि वाडीवऱ्हे येथे दोन वेगवेगळ्या अपघातात तिघे युवक गंभीर जखमी झाले. नरेन्द्राचार्य संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने गंभीर जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात हलविले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
पहिला अपघात दुपारी 12 ते 1 च्या सुमारास गोंदे भागात प्रभू ढाब्याजवळ झाला. एका मोटारसायकलला पाठीमागून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने ठोकर मारली. ह्या अपघातात एक युवक जखमी झाला. दुसऱ्या अपघातात वाडीवऱ्हे येथील वीज मंडळ कार्यालय भागात मोटारसायकल स्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. हा अपघात 6 च्या सुमारास घडला. यामध्ये दोन युवक गंभीर जखमी झाले.
दोन्ही अपघाताची माहिती समजताच नरेन्द्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक निवृत्ती पाटील गुंड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या समयसुचकतेने अपघातग्रस्तांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात वेळेत दाखल केले. यामुळे जखमींचा प्राण वाचला. 

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!