![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/06/gulabrao-patil-meeting-2-1-550x375-1.jpg)
इगतपुरीनामा न्यूज, दि.१७
इगतपुरी पाणीपुरवठा केंद्राच्या दुरुस्तीस पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पाणीपुरवठा केंद्रास 1988 मध्ये योजना कार्यान्वित झाल्यापासून आजतागायत मोठ्या स्वरूपाची कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नव्हती .या पार्श्वभूमीवर योजनेच्या दुरुस्तीसाठी सुमारे 41 लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या घसारा निधीतून उपलब्ध करून देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.