तातळेवाडी जवळील अपघात वाढवणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करा : माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
घोटी सिन्नर शिर्डी महामार्ग वर तातळेवाडी जवळ गेल्या पाच सहा महिन्यांत जवळपास 25 ते 30 अपघात झाले आहेत. एकाच वेळी चार पाच गाड्यांचे एकामागून एक या उताराच्या जागेवर हे अपघात होत आहे. वाहन, वाहन धारक, जीवितहानी होऊन मोठे नुकसान होत आहे. रस्ता बनवतांना चुकीचे पध्दतीने डांबरीकरण करून मोठ्या प्रमाणात ऑईलचे प्रमाण जास्त झाले. त्यामुळे या अर्ध्या किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात रस्ता एकतर खूप उताराचा अन गाडी यावरून जाताच रस्त्याच्या बाजूला सरकते. हे अपघात थांबवण्यासाठी रस्त्याची योग्य ती दुरुस्ती करावी. जागोजागी सूचना फलक लावावेत अशी मागणी इगतपुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांची श्री. वारुंगसे यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उन्हाळ्यात रस्त्यावर पातळ पणा होऊन हा रस्ता चोपडा होतो. त्यामुळे लहान मोठी वाहने स्लिप होतात. थोड्या पावसाने पूर्ण रस्ता चोपडा होऊन वाहने स्लिप मारत आहे. आतापर्यंत 25 ते 30 अपघात झाले असून अनेक वाहने, मालाचे नुकसान झाले. अनेक मोटार सायकलींचे नुकसान होऊन नागरिक जखमी झाले आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊनही कार्यवाही केली जात नाही. ह्या दुर्लक्षामुळे जीवितहानी होऊ शकते. ह्या भागातील शेतकरी बांधव जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. याप्रकरणी त्वरित दखल घेऊन संभाव्य अपघातग्रस्त ठिकाणी रस्ता दुरुस्ती करावी. सूचना फलक लावावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी त्वरित याची दखल घेऊन संबधित विभागाला सूचना करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Similar Posts

error: Content is protected !!