पांडुरंग वारुंगसे यांच्या दणक्याने तातळेवाडी रस्त्याची झाली दुरुस्ती

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
घोटी सिन्नर महामार्गावरील तातळेवाडी येथे चुकीच्या पद्धतीने झालेल्या रस्त्यामुळे अनेक वाहने अपघातग्रस्त होत आहेत. उन्हाळ्यात डांबर वितळून आणि पावसाळ्यात ऑइल उघडे पडून याआधी अपघात झाले आहेत. याबाबत इगतपुरीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांनी आज दुपारी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन दिले होते. यासह श्री. वारुंगसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही बळी जाण्याची वाट पाहत आहात का ? असा सवाल केला होता.
या पार्श्वभूमीवर “इगतपुरीनामा” मध्ये आज दुपारी वृत्त प्रसिद्ध झाले होते. पांडुरंग वारुंगसे यांचा दणका आणि इगतपुरीनामा मधील वृत्ताची तातडीने दखल घेण्यात आली. दुपारी संबंधित रस्त्यावर तात्काळ गतिरोधक बसवण्यात आले. यासह आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली. यामुळे वाहनधारक आणि या भागातील शेतकऱ्यांनी पांडुरंग वारुंगसे यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला.

दुपारी प्रसिद्ध झालेली बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://igatpurinama.in/archives/2686