इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
इगतपुरी तालुक्यातील व्हिटीसी फाटा ते बेलगाव कुऱ्हे रस्त्यावर आज दुपारी ३ च्या सुमारास दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. ह्या धडकेत २ जण गंभीर जखमी झाले. २ लहान मुलांना किरकोळ जखमा झाल्या. जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास व्हिटीसी फाटा ते बेलगाव कुऱ्हे रस्त्यावर मोटारसायकल क्रमांक MH15 HJ 0248 आणि दुसरी मोटारसायकल क्रमांक MH 15 DR 6521 यांची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. याबाबत प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ गोंदे फाटा येथील नरेन्द्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेला संपर्क साधला. रुग्णवाहिका चालक रुग्णमित्र निवृत्ती गुंड पाटील यांनी तातडीने सर्व जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघातात २ जण गंभीर जखमी झाले असून २ लहान मुले किरकोळ जखमी झाले आहेत.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group