इगतपुरी तालुका काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात निदर्शने

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
इगतपुरी तालुका काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सत्यजित तांबे यांच्या आदेशानुसार पाडळी देशमुख येथे पेट्रोल पंपावर निदर्शने करीत आंदोलन करण्यात आले. आमदार हिरामण खोसकर, अँड संदीप गुळवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या इंधनाच्या किमतीत घसरण असताना देखील पेट्रोल 100 च्या पार झाले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे असे वक्तव्य आमदार खोसकर यांनी केले. या सरकारला आता घरी बसवावे लागेल त्याशिवाय जनता सुखी होणार नसल्याचं अँड गुळवे यांनी सांगितले
या कार्यक्रमास काँग्रेसचे प्रांतिक सदस्य कचरू शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव भास्कर गुंजाळ, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम भोसले, किसान सेल अध्यक्ष सुदाम भोर, सेवादल अध्यक्ष दिलीप पाटील, बाळासाहेब कुकडे, सरचिटणीस गोपाळा लहांगे, कार्याध्यक्ष अरुण गायकर, युवक काँग्रेसचे उत्तम बिन्नर, कैलास घारे, गणेश कौटे, किरण पागेरे, आकाश भोर, रमेश देवगिरे, बाळासाहेब लंगडे, ज्ञानेश्वर कडू, पंढरी लंगडे, कमलाकर नाठे, निवृत्ती कातोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते
आंदोलन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव भास्कर गुंजाळ यांनी पेट्रोल शंभरी पार केल्यामुळे क्रिकेटपटू प्रमाणे हेल्मेट काढून व बॅट उंचावून अभिवादन केले. आता बस्स यापुढे द्विशतक नको अशा भावना व्यक्त करत वेगळ्या पद्धतीने लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला गेला.