कुरुंगवाडी, भरवज, शेणवड बुद्रुक येथे लसीकरण आणि विविध कार्यक्रम

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११

इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम कुरुंगवाडी येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गावात नियमित लसीकरण कार्यक्रम राबवण्यात आला. जागतिक हिवताप प्रतिरोध महिना सुरू असल्याने जनजागृती सुद्धा करण्यात आली. याप्रसंगी कीटकजन्य आजार व पाण्यापासून होणारे आजार याबाबतची माहिती आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिली. ह्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली कोळी, डॉ. शेख, दिनेश कुलकर्णी, सुनंदा माळोदे, डॉ. एन. पी. बडगुजर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण साळुंके, आरोग्य पर्यवेक्षिका सतन लॉंड्रीक, आरोग्य सहाय्यक रमेश आवारी, मंगला गायकवाड, व्ही. डी. वैष्णव, मनोज गावीत, आर. बी. पाटील, डी. जी. पराडके, सागर दिंडे, वेणू घारे, सीमा तोकडे आशा भारती सावंत, भारती भले, लंका तिटकारे, ज्योती भोर, मंदा  सावंत, गोरख बगाड, धुमाळ दाजी आदींनी ह्यामध्ये सहभाग घेतला.

शेणवड बुद्रुकला लसीकरण कार्यक्रमाला प्रतिसाद

काळुस्ते अंतर्गत उपकेंद्र खैरगाव येथील शेणवड बुद्रुक येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण आयोजित करण्यात आले होते. ह्या शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला. याकामी काळुस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली कोळी, सरपंच कैलास कडू, दिनेश कुलकर्णी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बडगुजर, सुनंदा माळोदे, आरोग्य सहाय्यक रमेश आवारी, सतन  लॉंड्रीक, आरोग्य सेविका मीना कहांडळ, भावना गायकवाड, आरोग्य सेवक उत्तम घोरपडे, सागर दिंडे, रवी पाटील, दिलवरशिंग पराडके यांनी ग्रामस्थांना प्रबोधन केले.
यावेळी श्री. बच्छाव, संतोष लेकुले आशा गटप्रवर्तक मीना तोकडे, आशा कामिनी शिंदे, रामेश्वरी कडू, लीला खडके, रंजना खडके, विठा मदगे, अंजना शिद, इंदू फोडसे, मीना शिंदे, विमल खडके, सर्व मदतनीस, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, शिपाई यांनी लसीकरणाला विशेष सहकार्य केले.

भरवज गावात लसीकरण संपन्न

काळुस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्र भरवज अंतर्गत कुरुंगवाडी येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण संपन्न झाले. सरपंच गोरख सावंत यांना लस देऊन कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. यावेळी जनजागृती निमित्त अतिदुर्गम डोंगराळ भागामध्ये धडक मोहीम राबविण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली कोळी, डॉ. शेख, दिनेश कुलकर्णी, सुनंदा माळोदे, डॉ. एन. पी. बडगुजर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण साळुंके, आरोग्य पर्यवेक्षिका सतन लॉंड्रीक, आरोग्य सहाय्यक रमेश आवारी, मंगला गायकवाड, व्ही. डी. वैष्णव, मनोज गावीत, आर. बी. पाटील, डी. जी. पराडके, सागर दिंडे, वेणू घारे, सीमा तोकडे आशा भारती सावंत, भारती भले, लंका तिटकारे, ज्योती भोर, मंदा  सावंत, गोरख बगाड, धुमाळ दाजी आदींनी साहाय्य केले.