इगतपुरीनामा न्यूज – कोलकाता येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंटस ऑफ इंडिया ( ICMAI ) तर्फे भारतभर घेतल्या जाणाऱ्या फाउंडेशन, इंटरमीडीएट व फायनल डिसेंबर २०२४ च्या परीक्षा संपन्न झाल्या. कॉस्ट अकाउंटेंट्स या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परिक्षांचे आयोजन हे केंद्र सरकारच्या “दि इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडिया (ICMAI) संस्थेच्या वतीने केले जाते. १२ वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वप्रथम फाउंडेशन ही परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे इंटरमेडिएट परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात. डिसेंबर २०२४ मध्ये अखिल भारतीय स्तरावर ही परीक्षा बीवायके कॉलेज नाशिक येथे घेण्यात आली. नाशिक शाखेतर्फे या परीक्षेसाठी सुमारे ७६१ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. एकूण दोन सत्रात ही परीक्षा पार पडली. फाउंडेशन विभागाचा निकाल जानेवारी २०२५ तर एंटरमेडीएट आणि फायनल फेब्रुवारी २०२५ मध्ये लागणार आहे. निकालाची माहिती संस्थेची वेबसाईट icmai.in वर देण्यात येणार असल्याची सुचना विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. संस्थेच्या २०२५ सालासाठीच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असुन प्रवेशासाठी ३१ जानेवारी २०२५ पर्यंत अंतिम मुदत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संस्थेच्या नाशिक कार्यालयात संपर्क साधुन प्रवेश घ्यावा. अधिक माहितीसाठी 0235-2500150/2509989 | www.icmai.in | nasik@icmai.in येथे संपर्क करावा असे आवाहन दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडिया ( ICMAI ) नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए अमित जाधव यांनी दिली आहे
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group