
राहुल बोरसे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
निरगुडे ता. त्र्यंबकेश्वर येथील सरपंच प्रवीण तुंगार यांच्या गट न 16 शिवार मधील आंबा बागेतील 3 ते 4 वर्षाच्या शेकडो 350 आंब्याची अज्ञात इसमाने कुरापत काढून रात्रीतून कत्तल केली आहेत. सरपंच तुंगार यांनी अतिशय मेहनतीने 3 वर्षांपासून इस्रायल पद्धतीने आंबा बाग लागवड करून मेहनतीने आंबा बाग तयार केली होती. परंतु अज्ञात इसमाने रात्रीच्या सुमारास बागेत कुणीही नसल्याचा फायदा घेत शेकडो झाडांची बुंध्याला कत्तल करून तोडून भुईसपाट केली आहेत. त्यामळे सरपंच प्रवीण तुंगार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आज या तोडणी केलेल्या बागेला आमदार हिरामण खोसकर यांनी भेट देऊन नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर महसूल विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे.
आज रात्री अज्ञातांनी माझ्या आंबा बागेतील 350 पेक्ष्या जास्त आंबा झाडांची कत्तल केली असून मोठे नुकसान केले आहे. तोडणाऱ्या व्यक्तींचा शोध होऊन त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे व मला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.
- प्रवीण तुंगार, सरपंच निरगुडे