कोरोनाची रुग्णसंख्या नीचांकी पातळीवर

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

कोरोनाची रुग्णसंख्या इगतपुरी तालुक्यात नीचांकी पातळीवर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. आरोग्य विभाग आणि इतर सर्व यंत्रणांच्या समन्वयाने कोरोनावर तालुक्याने चांगली मात केली आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आणणाऱ्या सर्वांबाबत जनतेत कृतज्ञता व्यक्त होत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमही आता विविध भागात जोमाने सुरू झाले आहे.

दरम्यान आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या वैद्यकीय अहवालानुसार २ कोरोना बाधित व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आज फक्त २ नव्या व्यक्तींचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तालुक्यातील दोन्ही कोविड सेंटरमध्ये आज दिवस अखेर फक्त १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. थोडीफार लक्षणे होती. मनाला काळजी वाटायला लागली. माझे नातेवाईक माधव बोकड ( चुंचाळे ) यांनी मला बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधीची माहिती दिली. विलगीकरणाबरोबर ह्या आयुर्वेदिक गोळ्यांचेही नियमित सेवन केल्याने लक्षणे निघून गेली. आठवडाभराने पुन्हा कोरोना चाचणी केली. ही चाचणी निगेटिव्ह आली. आमचा परिवार आणि नातेवाईक, मित्र मंडळी आता सगळे ह्या गोळ्यांचे सेवन करून कोरोना पासून स्वतःचा बचाव करत आहोत. 
- बाजीराव माळेकर, माळेकरवाडी वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी