
इगतपुरीनामा न्यूज – पिंप्री सदो जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलनाचा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला. देशभक्ती गीतांवर नृत्य, बेटी बचाओ बेटी पढाओसह उपक्रमांनी प्रेक्षकांना भावूक केले. विद्यार्थ्यांनी विविध विषयावर कार्यक्रम सादर केले. यावेळी केंद्रप्रमुख संजय बोरसे, उपसरपंच शहनाज शेख, फिरोज शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अमजद पटेल, तंटामुक्ती समिती अध्यक्ष बबलू उबाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नर्गिस पटेल, उपाध्यक्ष अब्बास पटेल, मतीन पठाण, बद्रोद्दीन शेख, आसिफ पटेल, जावेद पटेल, गफार शेख, शफी पटेल, अबुबकर पटेल आदी उपस्थित होते. सुन्नी मुस्लिम जमाततर्फे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते मुख्याध्यापक अब्रार आलम यांनी शाळेच्या सर्वांचे आभार मानले.