सीए फाऊंडेशन परीक्षेत सृष्टी चिंचोले देशात सहावी : इगतपुरीचे शिक्षण विस्ताराधिकारी प्रमोद चिंचोले यांची कन्या 

इगतपुरीनामा न्यूज – द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटटस ऑफ इंडिया (ICAI) मार्फत मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या सीए फाऊंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात सृष्टी प्रमोद चिंचोले या विद्यार्थीनीने भारतात पंधरावा क्रमांक प्राप्त केला होता. त्यात तिला ४०० पैकी ३४२ गुण प्राप्त झाले . गणितात तर तिला १०० पैकी १०० गुण प्राप्त झाले आहेत. त्यानंतर पुनर्मुल्यांकन केले असता अकांऊट विषयात तिचे १० गुण वाढले. त्यामुळे तिचे एकुण गुण ३५२ झाले. आता ती भारतात सहावी आलेली आहे. इगतपुरी पंचायत समितीचे शिक्षण विस्ताराधिकारी प्रमोद चिंचोले यांची ती कन्या आहे. विशेष म्हणजे मार्च २०२५ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेतही तिला ९५.८३ टक्के गुण मिळून बीवायके महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. तिच्या या यशात माईंड स्पार्क क्लासचे मयुर संघवी, शुभम संघवी, अंकिता संघवी, पायल संघवी, भुषण घोसर, प्रसाद मालपाणी यांचा मोलाचा वाटा आहे. तिच्या या यशाबद्दल नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!