

इगतपुरीनामा न्यूज – भरधाव वेगात घोटी येथील टोलनाक्यावरून प्रवास करणाऱ्या कंटेनर वाहनामुळे संपूर्ण केबिन उखडली आहे. या घटनेत टोल नाक्याचा कर्मचारी जखमी झाला असून त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. नितीन गोखले रा. गिरणारे असे कर्मचाऱ्याचे नाव असून त्याने सतर्कतेने पलायन केल्याने त्याचा जीव बचावला आहे. ही घटना आज दुपारी घोटी टोलनाक्यावर घडली आहे. कंटेनर चालकावर काय कारवाई करण्यात आली याबाबत समजू शकले नाही.काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती यामुळे कर्मचारी नितीन गोखले हा बचावला आहे अशी चर्चा टोलनाक्यावर सुरु आहे.