जळीतग्रस्त कुटुंबाला रोटरी क्लब हिलसिटीचे अध्यक्ष गोरख बोडके यांच्याकडून मदतीचा हात

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे येथील भारत दादा गांगुर्डे यांच्या राहत्या घराला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळाले होते. ह्या घटनेत सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरी रोख रक्कम, किराणा साहित्य, कपडे खाक होऊन हे कुटुंब रस्त्यावर आले आहे. रोटरी क्लब हिलसिटीचे अध्यक्ष गोरख बोडके यांना ह्या घटनेची माहिती मिळताच ऐन पावसाळ्यात डोक्यावरचे छप्पर गमावलेल्या गांगुर्डे कुटुंबाची भेट घेवून त्यांना संसारोपयोगी साहित्य आणि आर्थिक मदत केली. खऱ्या अर्थाने कुटुंबाला सावरण्यासाठी आधाराबरोबरच आर्थिक मदतीची गरज लक्षात घेऊन गोरख बोडके यांनी सामाजिक बांधीलकी जपली. ही संपूर्ण मदत त्यांनी स्वतःच्या खर्चातून केली आहे. जळीतग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात देऊन माणुसकीचा ओलावा टिकविण्याचे त्यांनी काम केले आहे. इगतपुरी तालुक्यात कोठेही अशी घटना झाली तर तात्काळ मदत करणारे समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. ह्या कुटुंबाला दानशूर व्यक्तींनी मदत केल्यास त्या कुटुंबाला सावरण्यासाठी मदत होणार आहे. यासाठी दानशूर व्यक्तींनीही आपली मदत करावी असे आवाहन गोरख बोडके यांनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!