घोटी सिन्नर महामार्गावर उंबरकोन फाट्यावरील अपघातात ४ जण जागीच ठार

इगतपुरीनामा न्यूज – घोटी सिन्नर महामार्गावर उंबरकोन फाट्याजवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये ४ जण जागीच ठार झाले असल्याचे समजते. मोटारसायकल आणि चारचाकी वाहनाचा हा अपघात आज दुपारी झाला. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत ३ गंभीर जखमी व्यक्तींना समर्थ सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. गंभीर जखमीमध्ये मेघा शिंदे, साहिल शिंदे, भूमिका वावरे यांचा समावेश असून त्यांना आता एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचे समजते. घटनास्थळी घोटी पोलीस दाखल झाले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. मयत व्यक्तींमध्ये ऋषिकेश तुळशीराम आगिवले वय २२, टिल्लू सोमनाथ आगिवले, वय २४, पिंटू राजेंद्र आगिवले. वय २१ सर्व रा. भावली खुर्द ता. इगतपुरी जि. नाशिक आणि एसएमबीटी नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थिनी वैष्णवी काशीद मूळ राहणार संगमनेर यांचा समावेश आहे. भावली परिसरातील ३ युवकांच्या मृत्यूमुळे ह्या भागात महाशिवरात्रीच्या दिवशी शोककळा पसरली आहे. MH 15 FZ 7885 ही पल्सर मोटारसायकल आणि कार क्रमांक MH 15 EB 7657 यांचा हा भीषण अपघात आहे.

Similar Posts

error: Content is protected !!