व्हिटीसी फाट्यावर भरधाव आयशरने ट्रकला धडक दिल्याने अपघात ; सुदैवाने जीवितहानी नाही

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६

अपघात शब्द ऐकून आता नागरिकांपुढे भीतीचे सावट पसरत आहे. अपघातांची मालिका वाढतच असून ह्यावर उपाययोजना करण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची आवश्यकता आहे. आज सकाळी सात वाजेच्या दरम्यान मुंबई आग्रा महामार्गावरील व्हिटीसी फाट्यावर भरधाव आयशर वाहनाने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून ठोकले. दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. MP 09 HH 3158 हा ट्रक रस्त्यावर उभा असतांना नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणारे MH 19 CY 7967 ह्या क्रमांकाच्या आयशर वाहनाने ट्रकला धडक दिल्याने अपघात झाला.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या चिंताजनक असून महामार्ग विभागाने लक्ष घालावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे. 

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!