
इगतपुरीनामा न्यूज – आज स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक, राजु सुर्वे, सहा. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे, पोहवा योगेश पाटील, संदीप नागपुरे, मेघराज जाधव, सचिन देसले, रविंद्र गवळी असे अवैध धंद्याची माहिती घेत होते. यावेळी पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मुळेगाव शिवारात हॉटेल निसर्ग कट्टयाच्या मागे असलेल्या कारवाचे डोंगर भागातील जंगलात कोणीतरी अज्ञात इसम हातभट्टी लावुन गावठी दारू तयार करीत आहे. ह्या पथकाने याठिकाणी छापा टाकून हातभट्टीवर कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळी साडेसातच्या सुमारास मुळेगाव शिवारात हॉटेल निसर्ग कट्टयाच्या मागे असलेल्या कारवाचे डोंगर भागातील जंगलात फरार अनोळखी आरोपी ( नाव पत्ता समजून आले नाही ) याने विनापरवाना बेकायदेशीररित्या स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी गावठी दारु विक्री करण्याच्या उद्देशाने गावठी हातभट्टीची तयार दारू, रसायन व इतर साहित्य साधने असा ४ लाख ५५ हजार किंमतीचे प्रोव्हीशन गुन्ह्याचा मुद्देमाल मिळुन आला. अनोळखी आरोपी ( नाव पत्ता समजून आले नाही ) याच्या विरुध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) (फ) प्रमाणे वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.