
इगतपुरीनामा न्यूज – रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आणि मूलभूत सुविधा मिळाल्या म्हणजे गावे विकसित होतात. वक्तृत्वापेक्षा कर्तृत्वाकडे लक्ष दिल्यास नेतृत्व घडते. लोकांच्या हृदयातील परमेश्वर आनंदी करण्यासाठी कार्याचा आलेख उंचावला पाहिजे. समाजाची केलेली सेवा थेट देवाला पोहोचते म्हणून ती सेवा प्रामाणिकपणे करावी असे संस्कार शेणित येथील पंडित जाधव यांच्या कुटुंबात आहेत. आजोबा कै. बहिरू पाटील जाधव १९६५ मध्ये इगतपुरी पंचायत समितीचे सभापती होते. त्यांनी दिलेला सेवेचा वारसा आणि सामाजिक कार्याची धुरा रोहित पंडित जाधव हे समर्थपणे चालवत आहेत. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस ( शप ) पक्षाकडून इगतपुरी पंचायत समितीच्या साकुर गणातून उमेदवारी करणार असल्याचे रोहित जाधव यांनी सांगितले आहे. साकुर गणातील प्रत्येक गावात माझा उत्तम संपर्क असून माझ्याकडे विकासाचे व्हिजन आहे. निवडून येऊन गणाचे नाव विकासाभिमुख साकुर गण अशी ओळख निर्माण करायचे माझे स्वप्न असल्याचे ते म्हणाले.
प्रत्येकाच्या सुख दुःखात धावून जाणारा युवा चेहरा म्हणून रोहित जाधव सर्वांना परिचित आहे. ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी हा युवा कार्यकर्ता नेहमीच तत्पर असतो. पदवीधर असलेले रोहित जाधव अनेकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आघाडीवर असतात. गणातील युवावर्गाशी असलेला जनसंपर्क आणि सामाजिक काम करण्याचा ध्यास त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ( शप ) पक्षाच्या माध्यमातून रोहित जाधव राजकारणात सक्रिय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस ( शप ) पक्षाचे प्रदेश संघटक उमेश खातळे, इगतपुरी तालुकाध्यक्ष काशिनाथ कोरडे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब खातळे, युवक कार्याध्यक्ष गोकुळ जाधव, युवक अध्यक्ष किरण कातोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणार आहे असे रोहित जाधव म्हणाले. काही काळात होणाऱ्या ह्या निवडणुकीत उमेदवारी करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नक्की विजय मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.