ज्ञानेश्वर मेढेपाटील, इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअमन पदाची ठरल्याप्रमाणे मुदत संपली. त्यानुसार राजीनामे देऊन पद रिक्त होते. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथे सोसायटीच्या कार्यालयामध्ये निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. शिवसेना नेते मनोहर मेढेपाटील, राष्ट्रवादी काँग्रसचे जेष्ठ नेते ॲड. कैलास पाटील, शिवसेना तालुका समन्वयक माजी चेअरमन समाधान बोडकेपाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक संपन्न झाली.
निवडीच्या सभेत चेअरमणपदी शिवाजी मेढेपाटील, व्हाईस चेअरमनपदी ॲड. कृष्णा बोडकेपाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक प्राधिकरण अधिकारी नितु शिंदे, सचिव रामदास महाले यांनी निवडणूक कामकाज पाहिले. शिवाजी मेढे हे वारकरी संप्रदायचे तालुका उपाध्यक्ष आहेत. कृष्णा बोडकेपाटील हे माजी सरपंच, शिवसेना तालुका समन्वयक समाधान बोडके यांचे ते बंधू आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये हुशार वकील म्हणून त्यांची ओळख आहे.
बैठकीवेळी संचालक मनोहर मेढेपाटील, ॲड. कैलास पाटील, संजय मेढेपाटील, ॲड।भास्कर मेढेपाटील, ॲड. शरद मेढेपाटील, भावडू बोडकेपाटील, अनुसया बोडकेपाटील, दत्तू जाधव, नंदराज मेढे,वामन मेढे, भोरू पारधी, गजीराम मेढे, ज्ञानेश्वर मेढेपाटील, सचिव रामदास महाले, त्र्यंबक मेंगाळ, ज्ञानेश्वर आहेर, मनू उदार आदी उपस्थित होते.