“आदिवासी उल गुलान मोर्चा”- बंजारा व धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देऊ नये यासह १९ मागण्या : शहापुर ते मंत्रालय मोर्चासाठी आदिवासी बांधव रवाना : आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवाध्यक्ष लकी जाधव करताहेत नेतृत्व

 

इगतपुरीनामा न्यूज – आदिवासी उल गुलान मोर्चा साठी इगतपुरी तालुक्यातून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव शहापूर तालुक्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. आदिवासी उल गुलानसाठी महाराष्ट्रभरातील अनेक जिल्ह्यातून आदिवासी बांधव शहापूर तालुक्याच्या दिशेने येत आहेत. शहापूर ते मंत्रालय मुंबई असा या मोर्चाचा प्रवास असून आदिवासी समाजाच्या महत्त्वाच्या १९ मागण्यांसाठी हा उल गुलान मोर्चा काढण्यात आला आहे. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज व धनगर समाजाला आदिवासीचे आरक्षण देऊ नये ही प्रमुख मागणी करण्यात आलेली आहे. भारत देश भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने चालतो. त्यामुळे हैदराबाद गॅजेटचा आरक्षणाशी काहीही संबंध  येत नाही. आम्ही हैदराबाद गॅजेटला अजिबात मानत नाही. धनगर समाज तसेच बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये. यासह आदिवासींच्या १९  प्रलंबित मागण्यासाठी या उल गुलान मोर्चाचा आयोजन करण्यात आले आहे. शहापूर ते मंत्रालय मुंबई असा हा पायी प्रवास असून १४ ते १६ सप्टेंबरला मंत्रालयासमोर हा मोर्चा जाणार आहे अशी माहिती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी दिली. लकीभाऊ जाधव हे ह्या मोर्चाचे समर्थ नेतृत्व करीत आहेत. व्हिडिओ बातमी पहा https://youtu.be/vnniOWcGRJ8

error: Content is protected !!